निपाणी : निपाणीतील अनुदानीत व विनाअनुदानीत शाळेत विद्यार्थ्यांकडून कर्नाटक राज्य सरकारने ठरवून दिलेल्या फी पेक्षा प्रमाणाबाहेर फी ची आकारणी करून कमी रकमेची पावती दिली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर “4 जे आर ह्युमन राईट्स केअर आँरगेनायझेशन” या संघटनेच्यावतीने शिक्षणमंत्री कर्नाटक राज्य, शिक्षणाधिकारी बेंगलोर, शिक्षणाधिकारी बेळगाव व क्षेत्र शिक्षणाधिकारी, निपाणी गटशिक्षणाधिकारी यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार करून सरकारी नियमाने फी घेणे व प्रत्येक शाळेमध्ये इयत्ता पहिली पासून इयत्ता दहावी पर्यंत सरकारने ठरवून दिलेल्या फी चे मोठे बोर्ड बनवून लावणे बाबत मागणी करण्यात आली होती. त्या आधारे निपाणी गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांना शैक्षणिक फी संदर्भातील माहिती बोर्डवर लावणेसाठी नोटीसा पाठवून संबंधित शाळांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भविष्यात शाळांच्याकडून आकारल्या जाणाऱ्या फी बाबत संघटनेकडून बारकाईने लक्षही ठेवले जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta