Thursday , March 5 2026
Breaking News

महिलांना रोजगार देण्याकरिता एंजल फाउंडेशनने घेतला पुढाकार

Spread the love

 

बेळगाव : महिलांना काम मिळावे तसेच त्यानी घराबाहेर पडून आपल्या पायावर उभे राहावे. या उद्देशाने एंजल फाउंडेशनच्या वतीने महिलांना शिवणकाम, विणकाम तसेच पापड तयार करणे याशिवाय विविध कामांविषयी माहिती देण्यात आली.

सर्व महिलांना रोजगार मिळावा याकरिता एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी शहरांमध्ये महिलांना रोजगार देण्याकरिता बैठका सुरू केल्या आहेत.

समर्थ नगर येथून त्यांनी या बैठकीला सुरुवात केली. यावेळी महिला मंडळ सोबत त्यांनी चर्चा केल्या आणि कशाप्रकारे आपण काम करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती दिली.

यावेळी त्यांनी श्री रेणुका देवी महिला मंडळ, श्री लक्ष्मी महिला मंडळ, श्री साई महिला मंडळ, श्री दुर्गा दुर्गाश्वरी महिला मंडळ, समर्थ महिला मंडळ, रिद्धी सिद्धी महिला मंडळ या मंडळामधील सर्व महिलांना त्यांनी मार्गदर्शन केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *