Thursday , March 5 2026
Breaking News

महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात व्हिडिओ चित्रीकरण प्रकरण; दोषींवर कडक कारवाईची करण्याची बेळगाव अभाविपची मागणी

Spread the love

 

बेळगाव : उडुपी येथील एका खाजगी महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात विद्यार्थिनींचे व्हिडीओ शुटिंगचे प्रकरण निंदनीय असून, कोणत्याही दबावाला बळी न पडता राज्य सरकारने या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बेळगाव महानगरच्या वतीने बेळगाव अतिरिक्त जिल्हा अधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून उडुपी येथील नेत्र ज्योती महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहात व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या ३ विद्यार्थिनींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

उडुपीच्या नेत्र ज्योती महाविद्यालयात शबानाज, आलिया आणि अलिमातुल शाफिया या विद्यार्थ्यांनी शौचालयाचा वापर करत हिंदू विद्यार्थिनींचा व्हिडिओ चित्रीकरण केला असून, महाविद्यालय प्रशासनाने प्राथमिक पाऊल म्हणून या प्रकरणाची चौकशी करून महिला विद्यार्थिनींना निलंबित केले आहे. ज्या पोलीस विभागाने गुन्हा नोंदवून तपास करणे अपेक्षित होते, त्यांनी काही दबावाला बळी पडून या घटनेचे सत्य बाहेर येण्यापासून रोखले. अभाविप आणि समाजाचा तीव्र विरोध आणि विद्यार्थी परिषदेने दिलेल्या निषेधानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेमागे जिहादींचा हात असल्याचा संशय असून या प्रकाराचे व्हिडीओ शूट करून मुलींना लव्ह जिहादसारख्या खड्ड्यात ढकलण्याचे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पालक चिंतेत आहेत. या प्रकरणातील आरोपींचा पोलीस विभागाने योग्य तपास करावा. सरकारने या प्रकरणात ढवळाढवळ करू नये आणि सत्य समोर आणून दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी काम करावे. या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

यावेळी अभाविपच्या प्रितम उपरी, रोहित अलकुंटे, कीर्ती रेवणकर, दर्शन हेगडे, अमोल, कावेरी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *