बेळगाव : हिंडलगा येथे घेण्यात आलेल्या ‘केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धेमध्ये’ मंडोळी प्राथमिक शाळेने घवघवीत यश संपादन केले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विजेत्या स्पर्धकांना इयत्ता सातवीच्या वर्गातर्फे पदके देऊन गौरविण्यात आले.
वैयक्तिक स्पर्धा : प्रथम क्रमांक
* हिरा मारुती दळवी (थाळी फेक)
* ममता शंकर फगरे ( लांब उडी)
* ऋतुजा पुंडलिक साळवी (गोळा फेक)
* स्वयं महादेव दळवी (लांब उडी व गोळा फेक)
* साईराज जोतीनाथ पाटील (उंच उडी)
गट स्पर्धा : प्रथम क्रमांक
* मुले व मुलींचा संघ (थ्रो बॉल)
वैयक्तिक स्पर्धा : द्वितीय क्रमांक
* पार्थ उत्तम कणबरकर (थाळी फेक)
* ममता शंकर वगैरे (गोळा फेक)
* ऋतुजा पुंडलिक साळवी (थाळी फेक)
वरील सर्व यशस्वी स्पर्धकांना शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षिका, पी.ई. शिक्षक व शिक्षक वृंद यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta