बेळगाव : दिनांक 27/07/2023 रोजी पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात पोक्सो या कायद्याविषयी जनजागृती करण्यात आली. या निमित्ताने कायदेतज्ञ ऍड. फकीरगौडा पाटील, ऍड. जगदीश सावंत आणि ऍड. सरिता पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. त्यानंतर विश्व भारत सेवा समिती संस्थेचे सेक्रेटरी प्रकाश नंदिहळी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व प्रा. स्मिता मुतकेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर ऍड. फकीरगौडा पाटील यांनी पोक्सो कायदा कसा अमलात आला. त्या कायद्याचे महत्त्व काय आहे. आणि कोणकोणत्या ठिकाणी आपण रिपोर्ट करू शकतो. कारण हल्ली मुलांच्या वरती शारीरिक मानसिक आणि लैंगिक शोषणाच्या घटना वाढत आहेत. अशा अत्याचारावर आपण निर्बंध घातले पाहिजे, यासाठी जनजागृती होणे, ही काळाची गरज आहे. आणि सर्व तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोक्सो कायद्याची माहिती पोहोचणे हे गरजेचे आहे. असे सांगून त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ऍड. जगदीश सावंत यांनी पोक्सो कायद्यामध्ये कशा प्रकारची शिक्षा आहे. त्याचबरोबर आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर ऍड. सरिता पाटील यांनी आपला वकिली व्यवसाय करत असताना पोक्सो या केसेस वरती अभ्यास करत असताना त्यांना आलेले अनुभव सांगताना कशा पद्धतीने मुलांच्यावर मानसिक, शारीरिक आणि लैंगिक शोषण केले जाते. अशी अनेक उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना कायदा हातात न घेणे व कायदा विषयी जनजागृती करणे, अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांना आवाहन केले व मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयूर नागेनहट्टी व आभार प्रा. के एल शिंदे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta