Saturday , September 21 2024
Breaking News

श्री सोन्या मारुती मंदिरातर्फे गो-रक्षकांचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : शहरातील आरटीओ सर्कल येथील पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिरातर्फे आयोजित आपल्या देशात मातृ स्वरूप मानल्या जाणाऱ्या गाईंच्या रक्षणकर्त्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.

पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिर येथे गेल्या शनिवारी दुपारी आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. यावेळी प्रारंभी स्वागत व प्रस्ताविक झाल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून गायीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात्वारे तिला नमन करण्यात आले. त्यानंतर माजी आमदार ॲड. बेनके यांच्या हस्ते गाईंचे रक्षण करून त्यांची काळजी घेणारे कार्यकर्ते निलेश हिरेहुली आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी आपले विचार व्यक्त करताना माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी प्रथम 24 तास गो -संरक्षणासाठी उपलब्ध असणाऱ्या निलेश हिरेकुली आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा केली. तसेच देशातील सर्व गो रक्षकांच्या सत्काराचे प्रतिनिधित्व करणारा हा सत्कार असल्याचे सांगितले प्रत्येकाने गायीचे रक्षण करणे ही हिंदू संस्कृती आणि धर्म आहे असे सांगून सर्वांनी गायींचे रक्षण करावे असे आवाहन त्यांनी केले.

सदर सत्कार समारंभाचे औचित्य साधून सर्व लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांच्या पुढाकाराने श्री मारुती मंदिर आवारात आमदारांच्या हस्ते बेलाच्या झाडाचे रोपटे लावण्यात आले. सत्कार समारंभाचे आयोजक पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिराचे पुजारी भाऊराव अनगोळकर, वीरेश हिरेमठ, जयवंत शंकापुरे, सचिन अनगोळकर, रोहित पासलकर, शनि हडकर, सतीश चौगुले, जोतिबा जाधव आदिसह गो हितचिंतक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार प्रकरणी; सहा जणांना 20 वर्षांची कठीण शिक्षा

Spread the love  बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *