Thursday , March 5 2026
Breaking News

उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदी दाम्पत्याची बिनविरोध निवड

Spread the love

 

बेळगाव : उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदी दाम्पत्याची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीमध्ये महिला आरक्षण असल्याने मथुरा बाळकृष्ण तेरसे यांची अध्यक्षपदी तर मथुरा यांचे पती बाळकृष्ण खाचू तेरसे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यात असलेले उचगाव गाव आहे. ८००० जवळपास लोकसंख्या असलेल्या या गावात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली.
उचगाव, बसुर्ते, कोणेवाडी अश्या तीन गावाची मिळून असलेली ही ग्राम पंचायतीत एकूण २१ जागा सदस्य आहेत. बाळकृष्ण तेरसे आणि त्यांची पत्नी मथुरा तेरसे यांनी पहिल्यांदाच ही निवडणूक लढवली आणि दोघांचीही अध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीवर महिला आरक्षण होते. बाळकृष्ण यांनी अनेक वर्षे गावात सामाजिक, शैक्षणिक कार्य केले. त्याचीच पोच पावती म्हणून गावकऱ्यांनी गावाचा कारभार बाळकृष्ण तेरसे व मथुरा तेरसे या पती-पत्नीच्या हातात सोपवला. ग्रामपंचायतीवर महिला आरक्षण असल्याने मथुरा तेरसे यांची अध्यक्ष पदी तर त्यांचे पती बाळकृष्ण तेरसे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *