
बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काल आणि आज शहरातील व्यापारी दुकानांवर छापे टाकून सुमारे 765 किलो जप्त केले. बंदी असलेले प्लास्टिक जप्त करून व्यापाऱ्यांकडून दंड वसूल केला.
महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या निर्देशानुसार शहरभर दि. 1 आणि आज दि. 2 रोजी तपासणी अधिकाऱ्यांनी 765 किग्रॅ. प्लास्टिक जप्त करून 88 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
आयुक्त अशोक दुडगुंटी म्हणाले की, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम-2016 आणि दुरुस्ती नियम-2022 नुसार पावले उचलण्यात आली आहेत. मनपा पर्यावरण विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या 14 आरोग्य निरीक्षक आणि 2 पर्यावरण अभियंता यांच्यासह विविध पथकांनी मंगळवारी विविध दुकानांची तपासणी करून ही कारवाई केली.
Belgaum Varta Belgaum Varta