Wednesday , March 4 2026
Breaking News

देसूर ग्रा. पं. अध्यक्षपदी लक्ष्मी पाटील, उपाध्यक्ष काशव्वा कांबळे

Spread the love

 

बेळगाव : देसूर (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतच्या नूतन अध्यक्षपदी लक्ष्मी शिवाजी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी काशव्वा वैजू कांबळे यांची निवड झाली आहे.

देसूर ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच सुरळीत पार पडली. यापैकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लक्ष्मी शिवाजी पाटील यांनी 15 पैकी 8 मते मिळवून आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय संपादन केला. उपाध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित होते. त्याकरिता काशव्वा वैजू कांबळे या एकमेव उमेदवार पात्र असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी नूतन अध्यक्षा लक्ष्मी पाटील आणि उपाध्यक्षा काशव्वा कांबळे यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.

About Belgaum Varta

Check Also

महिलांच्या तक्रारीची दखल घेत बेळगाव उत्तरच्या आमदारांकडून आश्वासनपूर्ती

Spread the love  बेळगाव : उत्तर मतदारसंघातील जनतेच्या समस्यांना प्रतिसाद देत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *