Sunday , July 26 2026
Breaking News

हरियाणातील हिंसाचाराच्या निषेधार्थ विहिंप-बजरंग दलाची निदर्शने

Spread the love

 

बेळगाव : हरियाणातील नुह आणि अन्य ठिकाणी समाजकंटकांकडून केलेल्या हल्ले आणि हिंसाचाराच्या घटनांच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून आंदोलन छेडण्यात आले.
हरियाणातील नुह आणि अन्य ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकांकडून मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून आणला जात आहे. बस, सरकारी वाहनांवर दगडफेक करून सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान करून शांतताभंग केला जात आहे. याच्या निषेधार्थ देशभरात आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने देशव्यापी आंदोलन छेडण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून बेळगावातही आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विहिंप आणि बजरंग दलातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विहिंपचे प्रांत कोषाध्यक्ष कृष्णा भट म्हणाले की, बजरंग दलातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून मेवाड व धार्मिक ठिकाणी दरवर्षी धार्मिक यात्रेचे आयोजन करण्यात येते. पण त्यात बाधा आणण्यासाठी मुस्लिम दहशतवाद्यांकडून नियोजनबद्धरित्या हल्ले घडवून निष्पापांना त्रास देण्यात येत आहे. कोणतेही सरकार असो, अशा मुस्लिम दहशतवाद्यांना मुळासकट उखडून लावण्यासाठी यंत्रणा राबवली पाहिजे. योगी आदित्यनाथांप्रमाणे दोषींवर बुलडोझर चालवला पाहिजे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील दहशतवाद मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत असताना, भारतात मात्र मुस्लिम दहशतवाद्यांनी असा धुमाकूळ घालणे दुर्दैवी आहे. सरकारने कठोर पावले उचलून त्यांचा निःपात केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी जय श्रीराम, इस्लामिक जिहादी दहशतवाद्यांना शिक्षा झालीच पाहिजे, दहशतवाद्यांचा निःपात केलाच पाहिजे आदी घोषणा दिल्या. त्यानंतर राष्ट्रपतींच्या नावाचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *