बेळगाव : अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 76 वा वर्धापन दिन गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता काळी आमराई येथील सह्याद्री पतसंस्थेच्या कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी शेकापच्या मध्यवर्ती समिती सदस्य ऍड. राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर ज्येष्ठ कार्यकर्ते नानू पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी ऍड. राजाभाऊ पाटील होते तर व्यासपीठावर जिल्हा चिटणीस विलास घाडी व तालुका चिटणीस एस. एल. चौगुले होते.
उपस्थितांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी जिल्हा पंचायत सदस्या सौ. सरस्वती पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, श्री. एन. बी. खांडेकर, श्री. बाळाराम पाटील, श्री. आर. आय. पाटील, एम. बी. निर्मलकर, हर्षवर्धन कोळसेकर, ईश्वर कल्लाप्पा गुरव, विठ्ठल पाटील, रावजी पाटील, विजय भाई विठ्ठलराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta