Saturday , June 6 2026
Breaking News

बरगांव केंद्र पातळीवरील शालेय क्रिडा स्पर्धा तोपिनकट्टी येथे संपन्न

Spread the love

 

खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेच्या पटांगणावर बरगांव केंद्र पातळीवरील शालेय क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार विठ्ठलराव हलगेकर व सौ. रुक्मिणी विठ्ठलराव हलगेकर उपस्थित होत्या.

यावेळी एसडीएमसी सदस्याकडून आमदार विठ्ठलराव हलगेकर, सौ. रुक्मिणी हलगेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी खेळाडूंना खेळाचे महत्व सांगितले, याच बरोबर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत मार्गदर्शन केले.

यावेळी एसडीएमसी अध्यक्ष परशराम तिरवीर, सौ. साक्षी गुरव उपाध्यक्ष, तसेच सुरेखा विनायक सुतार अध्यक्ष ग्रामपंचायत, श्रीमती रेणुका कोलकार उपाध्यक्ष, तसेच ग्रामपंचायत सदस्य, मारुती गुरुव, चांगाप्पा निलजकर, चांगाप्पा गुरव, श्री. शिवाजी करबळकर, लक्ष्मण तिराविर, सौ. लक्ष्मी तिरविर, मनोहर गुरव, नागेश कुरबर, मारुती गुरव, माऱ्याप्पा चांदिंनकोप, हनुमंत खाबले , लक्ष्मण बाचोळकर, सौ.निता खाबले, सौ.राधिका शापूरकर, सौ. ज्योती देवलकर, तसेच तालुका शिक्षण संघटना अध्यक्ष, उपाध्यक्ष व शिक्षक वर्ग, खेळाडू, गावातील नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

Spread the love  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *