
बेळगाव : हेस्कॉम विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील शेतकरी दाम्पत्याचा शेतात काम करत असताना विद्युत तार अंगावर अचानक पडल्याने शॉक लागून शेतकरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. 32 वर्षीय निसार महंमद मकबूल सनदी आणि 26 वर्षीय लता निसार सनदी अशी मृतांची नावे असून त्यांना एक लहान मुलगी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शेतातून जाणाऱ्या 11 के. व्ही. दाबाच्या विद्युतभारीत तारा अनेक वर्षांपासून गंजलेल्या स्थितीत आहेत. त्या तातडीने बदलण्यात याव्यात, अशी मागणी गावकऱ्यांनी वारंवार करून देखील हेस्कॉमने याकडे दुर्लक्ष केल्याने अजूनही धोका कायम आहे. हेस्कॉमच्या हलगर्जीपणामुळे या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून झालेल्या घटनेची पूर्ण चौकशी करून मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करत ग्रामस्थांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta