बेळगाव : मध्यवर्ती बस स्थानकावर पाकीटमारीचे प्रकार वाढीस लागले आहेत. रविवारी रात्री संकेश्वर येथील एका महिलेच्या बॅगमधून दहा हजार रुपये लांबवल्याची घटना घडली आहे. या घटनेने बस स्थानकावरील गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत. मध्यवर्ती बस स्थानकात भुरट्या चोऱ्या करणाऱ्या पाकीटमारांचा सुळसुळाट झाला आहे.
रविवारी सायंकाळी साडे सात ते आठ या वेळेत ही घटना घडली आहे. संकेश्वर येथील एक महिला आपल्या वैयक्तिक कामानिमित्त बेळगावला आली होती. ती आपले काम आटपून संकेश्वरला परत जात असता तिकीट काढताना कंडक्टरला आधार कार्ड दाखविण्यासाठी पर्स उघडली त्यावेळी बॅग मधील दहा हजार रुपये चोरीला गेल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले. सरकारच्या मोफत बस प्रवासाच्या योजनेमुळे आधार कार्ड दाखवून त्या महिलेला तिकीट मिळाले तर बॅगेमधील दहा हजार रुपये चोरीला गेल्याने तिला मोठा फटका सहन करावा लागला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta