बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेचे जिल्हा अध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण यांची बेळगाव जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व शिवसंदेश भारत समूहाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसंत संजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते डी. बी. पाटील, परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष व सीमाकवी रवी पाटील उपस्थित होते.
एम. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर संजय मोरे व डी. बी. पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सुधीर चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
चव्हाण यांच्यासारख्या मराठी माणसाची बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे ही मराठी माणसाच्या अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. डी. बी. पाटील व रवी पाटील यांचीही शुभेच्छापर भाषणे झाली.
यावेळी सत्काराला उत्तर देताना ऍड. सुधीर चव्हाण यांनी सर्वांच्या आशीर्वादामुळेच व पाठिंब्यामुळेच मला हे अध्यक्षपद मिळाले असून भविष्यातही आपण गोरगरीब जनतेची सेवा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गौंडाडकर यांनी केले. रणजीत चौगुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta