बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी स्वहर शहर स्वच्छतेच्या कामासंदर्भात विशेष काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. आयुक्त दुडगुंटी यांनी काल सोमवारी पहाटेच कचरा उचलणाऱ्या गाडीतून शहर उपनगरात सुरू असलेल्या स्वच्छता कामाची अचानक पाहणी केली होती.
त्यानंतर आज मंगळवारी ही त्यांनी सकाळी सकाळी दक्षिण विभागातील नाले तसेच स्वच्छता कामासंदर्भात पाहणी केली. त्यामुळे महापालिकेचे आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहेत. आयुक्तांनी केलेल्या सूचनेनुसार आरोग्य विभागाने शहर उपनगरातील व्यावसायिक ठिकाणी कमर्शियल भागात रात्रीच्या वेळेस स्वच्छता काम सुरू केले आहे. यापुढे शहर उपनगरातील प्रत्येक बाजारपेठ परिसरात सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत स्वच्छतेचे काम सुरु करण्यात आले आहे. आज सायंकाळीही शहापूर, वडगाव, खासबाग, टिळकवाडी या भागात सायंकाळनंतर आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी स्वच्छता कामात गुंतल्याचे पाहायला मिळत होते.