Thursday , March 5 2026
Breaking News

बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज करावेत

Spread the love

 

बेळगाव : जुलै महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीने बळ्ळारी नाला परिसर तसेच नाला फूटून ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पीकांवर गाळ जाऊन नुकसान झाले. त्या अनगोळ, शहापूर, वडगाव, जूनेबेळगाव, माधवपूर, हालगा, अलारवाड, बेळगाव या भागतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भातपिकांचे नुकसान झाले त्यांनी ताबडतोब संबंधीत तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करायचे आहेत. भरपाई रक्कम गुंठ्याला 80/85 रु. देणार आहेत, असे समजले आहे. तेंव्हा ज्यांच्या नावावर 7/12 आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात थांबून जीपीएसवर काढलेला फोटो, शेती उतारा, आधारकार्ड, राष्ट्रीय बँक खाते या सर्व कागदपत्रांची प्रत्येकी झेरॉक्स घेऊन संबंधीत तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करावे. तेंव्हा नाला परिसरातील सर्व शेतकरी बंधूनी अर्ज करावेत. बेळगाव शहर, तालुका रयत संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *