बेळगाव : आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले हिंदुस्थान प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या बेताल वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण गढूळ झाले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी राजकीय पक्ष तसेच अनेक संघ संघटनांनी केली आहे. संभाजी भिडे यांच्या बेताल वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव येथील विविध संस्था व संघटनाच्यावतीने उद्या शुक्रवार दि. 11 ऑगस्ट रोजी संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार होते. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात येत आहे. पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल. कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी, असे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ पाटील यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta