नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांची याच पदावर फेरनिवड करण्यात आली आहे.
त्यांनी दशकभरापासून देशभरातील भाजप संघटनेचे कार्यक्षमतेने नेतृत्व केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर पुन्हा एकदा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या या कार्यकाळात पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिक प्रेरणा मिळेल आणि भाजपची संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांच्या फेरनिवडी बद्दल बोलताना व्यक्त होत आहे.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासमवेत भाजप कर्नाटक राज्य ओबीसी विभागाचे सचिव किरण जाधव यांनी बी. एल. संतोष यांची भेट घेऊन पदावरील फेरनिवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले तसेच आगामी कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान रमेश जारकीहोळी आणि किरण जाधव यांनी त्यांच्याशी, कर्नाटक आणि बेळगाव जिल्ह्यातील भाजप संघटनेच्या बांधणी संदर्भात चर्चा केली.
यावेळी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हर घर तिरंगा मोहिमेसाठी रमेश जारकीहोळी व किरण जाधव यांच्या हाती तिरंगा ध्वज सुपूर्द केला.
Belgaum Varta Belgaum Varta