
बेळगाव : कंग्राळी खुर्द गावातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी तसेच ग्रामपंचायत सदस्य कु. प्रशांत गोपाळ पाटील हे प्रतिवर्षी आपल्या जन्मदिवसाच्या निमित्त एक अनोखा उपक्रम राबवत असतात. त्याचप्रमाणे या जन्मदिवसानिमित्त मराठी शाळेच्या वरांड्यातील व व्यासपीठावरील फरशी फुटून ठिकठिकाणी खड्डे पडले होते. याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलं होतं पण ही बाब प्रशांत पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून ते काम पूर्ण केले.
यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील, यशोधन तुळसकर, वैजनाथ बेन्नाळकर तसेच पैलवान शुभम पाटील, बबन पावशे, रोहित पाटील, प्रेम जाधव, दर्शन पाटील, रणजीत पाटील अविनाश बाळेकुंद्री, उमेश पाटील आम्हाला मोलाचं सहकार्य केलेले गवंडी मिस्त्री गणपत मोहनगेकर, कल्लाप्पा पाटील, प्रदीप पाटील, महादेव बाळेकुंद्री तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व शिक्षण प्रेमी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta