मुतगे : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मुतगे येथे मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अर्थसहाय्यातून गणवेश वितरण समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. वाय. पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब काकतकर होते.
प्रारंभी फोटो पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. कोंडसकोप यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी मराठा बँकेच्या वतीने कार्यक्रम राबवले जातात. मराठा समाज शिकावा आपल्या पायावर भक्कम व्हावा या दृष्टीने बँकेच्या वतीने विविध उपक्रम राबविले आहे. विद्यार्थ्यांनी दहावीपर्यंत शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतले पाहिजे. मराठा बँकेने बेळगाव आणि बेळगावसह इतर भागासाठी मदतीचे हात पुढे केले आहेत विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर यश संपादन केले पाहिजेत असे प्रतिपादन बँकेचे माजी चेअरमन व संचालक बाळासाहेब काकतकर यांनी दिले.
यावेळी संचालक सुनील अष्टेकर, बी. एस. पाटील, एन. डी. बंडाचे, अध्यक्ष आर. वाय. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शाळा सुधारणा समिती सदस्य शिरीष पाटील, सुधीर पाटील, रेखा अंची, प्राचार्य एस. एस. जाधव मुख्याध्यापक बी. बी. कोंडसकोप, एस. आर. तिरविर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस के. मोरे यांनी केले तर आभार टी. डी. कुराडे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta