बेळगाव : ‘मजदूर नवानिर्माण संघ’, बेळगांव जिल्हा बांधकाम कामगार संघटना आणि येळ्ळूर कामगार संघाच्या माध्यमातून येळ्ळूर परिसरातील बांधकाम कामगार व रोजगार (मनरेगा) कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी येळ्ळूरच्या चांगळेश्वरी मंदीरात शुक्रवार दि. 18/08/2023 रोजी सायंकाळी 7 वाजता बैठक आयोजित केली आहे.
सदर बैठकीमध्ये बांधकाम कामगारांच्या किंवा त्यांच्या दोन मुला-मुलींच्या लग्नाच्या सहाय्यधन, कामगारांच्या दोन मुला-मुलींच्या स्कॉलरशिपसंदर्भात, आजारपण किंवा ऑपरेशन झालेल्यांना, अपघाती मृत्यू झाल्यास सहाय्यधन मिळण्यास कसा अर्ज करावा तसेच कामगारांच्या विविध सवलतीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ‘मजदूर नवानिर्माण संघ’ व बेळगांव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेमार्फत चांगळेश्वरी मंदिरात जेष्ठ सामाजिक समाजसेवक डाॕ. शिवाजी कागणीकर व ॲड. एन आर लातूर मार्गदर्शन करण्यासाठी येळ्ळूरला येणार आहेत, तरी येळ्ळूर परिसरातील इच्छूक कामगारांनी शुक्रवारी 18/08/2023 रोजी सांयकाळी 7 वाजता चांगळेश्वरी मंदीर, येळ्ळुर येथे बैठकीला हजर रहावे. याचप्रमाणे
कामगारांच्या मुला-मुलींपैकी नववी, दहावीला शिकणाऱ्या किंवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळण्यासंदर्भात माहिती हवी असल्यास त्या विद्यार्थ्यांनीही बैठकीला यावे. सर्व कामगारांनी आपल्या सवलती मिळविण्यास संघटीतपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Belgaum Varta Belgaum Varta