बेळगाव : नागरिकांनी आपला दैनंदिन कचरा ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा असे वेगवेगळे करून कचरा गोळा करणाऱ्या सफाई कामगारांना द्यावा. बेळगांव शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करावे. घनकचरा विल्हेवाट नियम 2016 च्या योग्य अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे, असे आयुक्त अशोक दुडगुंडी यांनी सांगितले.
महानगरपालिकेने घरोघरी जाऊन कचरा उचलण्याबाबत प्रभागनिहाय आवश्यकतेनुसार सकाळी निवासी भागात तर संध्याकाळी व्यावसायिक भागात कचरा उचलण्यासाठी वाहने नियुक्त केली आहेत आणि जनतेचा दैनंदिन कचरा उचलण्यासाठी वाहने नियुक्त केली आहेत. जनता आपला दैनंदिन कचरा महानगपालिकेने नियुक्त केलेल्या कचरा गाडीत दिला जातो. मात्र अपेक्षित स्तरावर नेमून दिलेल्या वाहनांपर्यंत कचरा पोचविला जात नाही. काही सार्वजनिक व व्यावसायिक दुकान मालक आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जमा होणारा कचरा रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेवर टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे बेळगांव शहराचे सौन्दर्य आणि शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
घनकचरा विल्हेवाट नियम 2016 आणि राष्ट्रीय हरितकरणाच्या निर्देशनानुसार सर्व जनतेला त्यांचा दैनंदिन कचरा ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा असे विघटन करून कचरा गोळा करणाऱ्यांना देणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना घनकचरा विल्हेवाटीच्या उपविधीनुसार दंड आकारण्यात येईल आणि महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या खाजगी खुल्या जागेची साफसफाई मालकाने स्वतः करावयाची आहे. महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंडी यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे की जर काही चूक झाली असेल तर महानगरपालिका खाजगी खुली जागा स्वच्छ करेल आणि त्या जागेच्या मालकाच्या खात्यात साफसफाईचा खर्च जमा केला जाईल.
Belgaum Varta Belgaum Varta