निपाणी (वार्ता) : बोरगांव येथे श्री अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघ व गोकुळ दूध कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लसींचे मोफत वितरण बोरगाव पीकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तोडकर, उपाध्यक्ष सिकंदर अफराज, संचालक मायगोंडा पाटील, शीतल हवले, रावसाहेब पाटील (खानबा), जयपाल कोरवी, अजित सावळवाडे, संस्थेचे सिईओ बाहुबली खवटे, डॉ. शिवप्रसाद मडिवाळ, अशोक माळी, सुरेश पाटील, दिलीप पाटील, आण्णासाहेब पाटील व संचालक उपस्थित होते.