बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात क्रीडा आणि सांस्कृतिक वार्षिकउत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून बेळगाव रामकृष्ण मिशन आश्रमचे स्वामी मोक्षात्मनंद महाराज यांचे दिव्य सानिध्य लाभले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव अबकारी अधीक्षक विजयकुमार हिरेमठ हे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉ. एच. जे. मोळेराखी यांनी भूषविले होते..
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली. प्रा. जी.एम. कर्की यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर डॉ. डी.एम. मुल्ला यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
दीपप्रज्वलनानंतर उपदेशात्मक भाषणात स्वामी मोक्षात्मनंद महाराज म्हणाले की, साधनेला प्राप्त करण्यासाठी शांत मन आणि समर्पण भावनेची आवश्यकता आहे. मनुष्य आपल्या जीवनात फळाची अपेक्षा न ठेवता तत्वांना अनुसरण जीवन जगला तर फळ त्याला न कळता मिळते.
प्रमुख अतिथी पदावरून बोलताना अबकारी अधीक्षक विजयकुमार हिरेमठ म्हणाले की, विद्यार्थ्यांना जीवनात सफल बनण्यासाठी ज्ञान, अनुशासन आणि प्रयत्न आवश्यक आहे. प्रयत्नशील मनुष्य जीवनामध्ये उंच उंच शिखर गाठू शकतो.
यावेळी प्रा. मनोहर पाटील यांनी वार्षिक वर्दी चे वाचन केले.या कार्यक्रमा मध्ये सांस्कृतिक आणि क्रीडा विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
प्राचार्य डॉ. एच.जे. मोळेराखी यांनी यावेळी अध्यक्षीय भाषण केले. डॉ.गिरजाशंकर माने आणि प्रा. गौरी हलगेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. मनीषा चौगुले यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला जिमखाना चेअरमन प्रा. आर. एम. तेली, क्रीडा शिक्षक प्रा. राजू हट्टी, संयोजिका सुरेखा कामुले, प्रा. अर्चना भोसले, प्रा.भाग्यश्री चौगले आणि प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta