Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव– दिल्ली विमानाचे बुकिंग सुरू

Spread the love

 

बेळगाव : अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या बेळगाव-दिल्ली थेट विमानाचे बुकिंग सुरू झाले आहे. बेळगाव ते नवी दिल्ली अशी इंडिगोची विमानसेवा १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यासाठी आतापासूनच बुकिंग सुरू झाले आहे.

विमान नवी दिल्लीहून दुपारी ३.४५ वाजता निघेल आणि संध्याकाळी ६.०५ वाजता बेळगावला उतरेल. 2 तास 20 मिनिटे प्रवास वेळ. बेळगावहून संध्याकाळी 6.35 वाजता निघून रात्री 9 वाजता दिल्लीला पोहोचेल.

दिल्ली – बेळगाव ५२९४ आणि बेळगाव – दिल्ली ४७१९ तिकीट भाडे. कर वेगळा आहे.

पूर्वी बेळगाव ते नवी दिल्ली विमानसेवा होती. प्रवाशांची संख्याही पुरेशी होती. पण एका एकी उड्डाण रद्द करून हुबळीहून सुरू झाली. आता पुन्हा बेळगावहून विमानसेवा सुरू होत आहे.

बेळगाव-दिल्ली विमानसेवा सुरू करण्यासाठी लोकसभा सदस्य अण्णासाहेब जोल्ले आणि राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी खूप प्रयत्न केले होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *