Thursday , March 5 2026
Breaking News

तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला तिहेरी मुकुट

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित प्राथमिक व माध्यमिक आंतरशालेय मुला मुलींच्या तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने तिहेरी मुकुट संपादन केला तर बालिका आदर्श शाळेनेही प्राथमिक मुलींचे विजेतेपद पटकाविले.

प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा पेनाल्टी शूटआउटवर 3-2 असा पराभव केला. विजय संघाच्या निरंज घाडी, श्रेयस किल्लेकर, मनीष शेट्टी यांनी गोल केले.
तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत बालिका आदर्श शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा 3-1असा पराभव केला. विजय संघाच्या शिवानी हिने तीन गोल केले माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा 5-2असा पराभव केला. विजयी संघाच्या अभिषेक गिरीगौडरने 2 गोल तर लिंगेश नाईक ,प्रथमेश शहापूरकर, प्रणव यांनी प्रत्येकी 1 गोल केले.
तर मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने कॅन्टोन्मेंट शाळेचा 1-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. विजयी संघाच्या कर्णधार समीक्षा बुद्रुकने 1 गोल केला. वरील विजेते 4 संघ सोमवार ता. 28. रोजी डिवाईन मर्सी मच्छे येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर पी वंटगुडी, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, कॅम्प माध्यमिक विभाग संघटनेचे अध्यक्ष नागराज भगवंतण्णावर, एच व्ही रोगी, चंद्रकांत पाटील जयसिंग धनाजी, बापूसाहेब देसाई, प्रकाश बजंत्री चेस्टर रोझारियो या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाला प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी क्रीडाशिक्षक देवेंद्र कुडची, मयुरी पिंगट, सचिन कुडची, ज्युलेट फर्नांडिस, साकीब बेपारी, मानस नायक, चंद्रकांत तुर्केवाडी उमेश मजुकर, यश पाटील, शिवकुमार सुतार, आदी मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *