बेळगाव : बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हुलबत्ते कॉलनी परिसरात आज सकाळी कोल्ह्याचे दर्शन घडले. भर वस्तीत कोल्ह्याचे दर्शन घडल्याने परिसरात घबराट पसरली असून वनखाते कोल्ह्याच्या मागावर आहे.
बेळगावकरांसाठी वर्षभरापूर्वी बेळगाव रेस कोर्स मैदान परिसरात दाखल झालेला बिबट्या, वाघ हे त्याचे उत्तम उदाहरण असतानाच चक्क हुलबत्ते कॉलनी सारख्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कोल्हासारखा चतुर हिंस्र प्राणी आढळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होण्याबरोबरच संबंधित परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कांही धाडसी लोकांनी घराच्या परसदारी अन्नाच्या शोधार्थ फिरणाऱ्या या कोल्ह्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ देखील टिपला आहे.
दरम्यान याबाबतची माहिती मिळताच वनखात्याची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हुलबत्ते कॉलनी परिसरात धाव घेऊन कोल्ह्याचे शोध कार्य हाती घेतले आहे.
या शोध मोहिमेत श्रीराम सेना हिंदुस्तानचे कार्यकर्ते देखील वनखात्याला सहकार्य करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta