बेळगाव : स्वराज्य शेतकरी कामगार युवक मंडळ, पारिजात काॅलनी भाग्यनगर अनगोळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास 55 वर्षे पूर्ण होत आहेत या निमित्ताने मुळचे कलमेश्वर गल्ली येळ्ळूर व सध्या पारिजात काॅलनी भाग्यनगर अनगोळ येथे वास्तव्यास असलेले नामांकित व्यावसायिक श्री. मनोहर मेणसे व त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या नेत्रा मेणसे या दांपत्याने मंडळाच्या गणेशोत्सवासाठी कायमस्वरूपी लोखंडी मंडपासाठी धनादेश स्वराज्य शेतकरी कामगार युवक मंडळाकडे देणगी स्वरुपात सुपुर्द केला. या आधीही मेणसे कुटुंबाने गणेशोत्सवासाठी तसेच परिसरातील सामाजिक कार्यासाठी वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे.
यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सतिश धामणेकर, सदस्य रामदास धुळजी, यल्लाप्पा धामणेकर, आनंद कुंडेकर, आकाश नायकोजी, गजानन कुंडेकर, नागराज धामणेकर, रंजित शहापूरकर, विनायक कुंडेकर, अक्षय शहापूरकर, जीवन कुंडेकर व इतर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta