Wednesday , March 4 2026
Breaking News

कुख्यात गुन्हेगार बन्नंजे राजाची कडक बंदोबस्तात बिम्समध्ये वैद्यकीय तपासणी

Spread the love

 

बेळगाव : कारवार येथील उद्योगपती नायक यांच्या हत्याप्रकरणी बेळगावच्या हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुन्हेगार बन्नंजे राजाची तब्येत बिघडली असून त्याला आज तातडीने बिम्स जिल्हा रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

उद्योगपती नायक यांच्या हत्याप्रकरणी कुख्यात गुन्हेगार बन्नंजे राजा याला न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सध्या तो हिंडलगा कारागृहात शिक्षा भोगत शिक्षा भोगत आहे. दरम्यान आज प्रकृती बिघडल्याची तक्रार केल्यानंतर हिंडलगा कारागृह प्रशासनाची धावपळ उडाली. आज सकाळी तुरुंगातून पोलिसांनी त्याला कडेकोट बंदोबस्तात बेळगावच्या बिम्स सरकारी रुग्णालयात आणले. कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांनी हिंडलगा कारागृहातून बिम्स रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांकरवी त्याचे सिटी स्कॅन करण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा कडेकोट बंदोबस्तात कारागृहात नेण्यात आले. बन्नंजे राजा हा अंडरवर्ल्डशी संबंधित खतरनाक गुन्हेगार असल्याने यावेळी सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त होता.

 

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *