बेळगाव : कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील उदयोन्मुख पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर याने बेळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रवळनाथ कणबरकर यांनी 80 किलो वजनी गटाची अंतिम फेरी जिंकून विजेतेपद मिळवल्याने त्याची राज्यस्तरीय निवड झाली आहे. पै. रवळनाथ हा मठपती कुस्ती आखाडा, सावगाव येथे कुस्तीचा सराव करतो. बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या रवळनाथ याला कुस्ती प्रशिक्षक कमल शेरावत (हरयाणा) व प्रशालेचे क्रीडा शिक्षक गोविंद गावडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
राज्यस्तरीय निवडीद्वारे त्याने कावळेवाडी गावाच्या नावलौकिकात भर घातला आहे. गेल्यावर्षी कावळेवाडी वाचनालयाने प्रोत्साहनार्थ 10 हजार रु. रोख देऊन त्याचा सन्मान केला होता. रवळनाथ याने यंदा राज्यस्तरीय निवड होऊन राष्ट्रीय स्तरावर धडक द्यावी अशी अपेक्षा वाय. पी. नाईक यांनी व्यक्त केली आहे. राज्यस्तरीय निवडीबद्दल पै. रवळनाथ कणबरकर याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta