बेळगाव : शिवबसव नगर येथे एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
दि. 30 ऑगस्ट रोजी रात्री माळमारुती पोलीस स्टेशन हद्दीतील शिवबसव नगर येथे नागराज इराप्पा गाडीवड्डर या तरुणाचा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दगडाने ठेचून खून केला होता. हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हे प्रकरण संवेदनशील असल्याने डीसीपी शेखर, एसीपी कट्टीमनी यांनी घटनास्थळी भेट देऊन छडा लावण्याचे काम सोपवण्यात आले होते. कायदा सुव्यवस्था पोलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी मार्केट उपविभाग
एन. व्ही. भरमणी आणि माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर जे. एम. कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाला संशयित आरोपींबाबत मोठी माहिती मिळाली आणि ते कोल्हापूर येथे गेले असता आरोपी प्रथमेश धर्मेंद्र कसबेकर (वय 20 रा. राजारामपुरी बायचापा चाळ गल्ली, कोल्हापूर) आणि आकाश कडाप्पा पवार (वय 21 रा. राजाराम चौक, ए वार्ड, कोल्हापूर) या दोघांना कोल्हापुरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना पोलीस कोठडीत घेऊन पुढील तपास करण्यात येणार आहे. फरार असलेल्या मुख्य आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एसीपी मार्केट उपविभाग
एन. व्ही. भरमणी, पोलीस निरीक्षक कालीमिर्ची, पीएसआय होनप्पा तलवार, श्रीशैल आणि कर्मचारी कुंदेड, चिन्नाप्पगोळ, बस्तवाड गौरानी, होसमनी आणि मुजावर या अधिकाऱ्यांच्या कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.