Thursday , March 5 2026
Breaking News

पुष्पा स्टाईलने दडवलेला लाखो रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त

Spread the love

 

बेळगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर विधानसभेत जवळ मालवाहू ट्रकमध्ये प्लायवूडच्या फळ्यांमध्ये दडवलेला गोव्याहून अन्यत्र नेण्यात येणारा महागडा अवैध दारू साठा जप्त केल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अबकारी खात्याने दिलेल्या माहितीनुसार बेळगाव येथे सापडलेला आजपर्यंतचा सर्वात मोठा अवैध दारू साठा आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गोव्याहून येणाऱ्या मालवाहू ट्रक मधून मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा बेकायदेशीररित्या अन्यत्र नेत असल्याची टीप अबकारी खात्याला खबऱ्यांकडून मिळताच बेळगाव अबकारी खात्याचे अधीक्षक विजयकुमार आणि उपाधीक्षक मुरगोड यांच्या मार्गदर्शनाखाली अबिकारी खात्याच्या पथकाने सापळा रचून गोव्याहून निघालेल्या संबंधित ट्रकचा पाठलाग करत काल मध्यरात्रीच्या सुमारास शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्गावर हलगा गावाजवळील सुवर्णसौधजवळ (केए 25 एए 6461) क्रमांकाचा ट्रक अडविला.
संबंधित अधिकाऱ्यांनी ट्रक चालकाची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा संशयावरून सदर ट्रक बेळगाव अधिकारी भवन आवारात आणण्यात आला. त्यानंतर शनिवारी सकाळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधी समक्ष ट्रकची झडती घेण्यात आली. यावेळी ट्रकमध्ये भरलेल्या प्लायवूडच्या मोठ्या फळ्यांमध्ये आतल्या बाजूला प्लायवूड कापून निर्माण केलेल्या दोन कप्प्यांमध्ये महागड्या उंची दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. बाहेरून कोणालाही कल्पना येणार नाही अशा पद्धतीने दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आपल्या पुढच्या फळ्यांमध्ये दडविण्यात आल्या होत्या. जप्त करण्यात आलेल्या दारू साठ्यांमध्ये ब्लेंडर प्राईड, सिग्नेचर यासारख्या विविध महागड्यात दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर बियरच्या बाटल्या देखील सापडल्या आहेत.
अबकारी खात्याचे संयुक्त आयुक्त फिरोज खान किल्लेदार यांनी अबकारी भवन आवारात आज सकाळी प्रसिद्धी माध्यमांना सदर कारवाईची माहिती दिली. त्याचप्रमाणे जप्त करण्यात आलेल्या दारू साठ्याची अद्याप संपूर्ण तपासणी आणि मोजतात करावयाचे आहे त्यामुळे त्यानंतरच जप्त झालेल्या दारूची निश्चित किंमत समजणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच बेळगावात अबकारी खात्याने आजवर जप्त केलेल्या अवैध दारू साठ्यापैकी हा सर्वात मोठा दारूसाठा आहे. सदर दारू गोव्याहून कोठे नेण्यात येत होती? या मागचा खरा सूत्रधार कोण? याबाबत सखोल चौकशी व तपास करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *