बेळगाव : दसरा क्रीडा स्पर्धेत जिल्हा पातळीवर झालेल्या बॉस्केटबॉल स्पर्धेत येथील सुप्रसिद्ध जीएसएस महाविद्यालयाच्या संघाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात आरएलएसचा १५-१४ अशा फरकाने पराभव करून अजिंक्यपद पटकावले. या संघाची आता राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खानापूर तालुक्यातील बिडी येथील होलीक्रॉस पी. यु. काँँलेजच्या मैदानावर ही स्पर्धा शुक्रवारी पार पडली.
अंतिम सामन्यापूर्वी जीएस एसने केएल ई इन्डिपेंडंट व आरपीडी या संघाचा पराभव केला होता.
या संघात लक्ष्मीपथी, कर्णधार व उपकर्णधार नंदन ताशिलदार यांच्यासह मुकुंद जाधव, शुभम मोते, शोनान निलवर्णे, अमन, निरंजन चिंचणीकर, ओम कोटबागी, तज्जू कोटुर, सोहम, जिशान सत्तीगेरी यांचा समावेश होता. या संघाला क्रीडा शिक्षक विनय नाईक यांचे मार्गदर्शन व प्राचार्य एस. एन. देसाई आणि व्यवस्थापन मंडळाचे प्रोत्साहन लाभले. विजेत्या संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta