Thursday , March 5 2026
Breaking News

मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्यावतीने उद्या शेतकरी मेळावा

Spread the love

 

बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा, हितचिंतकांचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक ५ रोजी दुपारी ठीक ११.०० वाजता मराठा मंदिर मंगल कार्यालय (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे या शेतकरी मेळाव्याला सुरुवात होणारे आहे.
या शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने- पाटील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या शेतकरी मेळाव्याला तालुक्यातील समस्त शेतकरी बंधूंनी, शेतकरी हितचिंतकानी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मार्कंडेय साखर कारखान्याचे नूतन संचालक तानाजी पाटील व आर. आय. पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *