बेळगाव : चित्रदुर्ग तालुक्यातील मल्लापूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात एकूण 6 जण ठार झाल्याचे वृत्त समजते. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत झाल्याची माहिती आहे. मृतातील दोन जण वडगाव विष्णू गल्लीतील रहिवासी असल्याचे समजते.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, वडगाव येथील शमशुद्दीन व तबरेज हे पितापुत्र आपल्या मुलीला सोडण्यासाठी तुमकूरला रात्री 1.30 ला निघाले असता वाटेत उभ्या असलेल्या लॉरीला भरधाव कार आदळल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुःखद घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात पण उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते.
चित्रदुर्ग ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला. या अपघाताबाबत चित्रदुर्ग ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta