बेळगाव : 1 सप्टेंबर 2023 रोजी नेताजी हायस्कूल सुळगा येथे पार पडलेल्या येळ्ळूर क्लस्टर प्रतिभा कारंजी स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
कन्नड काव्यवाचन लक्ष्मी लोहार प्रथम, चर्चा स्पर्धेत करुणा मजूकर प्रथम, रांगोळी स्पर्धेत रेश्मा कुगजी प्रथम, मिमिक्री स्पर्धेत समर्थ दणकारे प्रथम, भरतनाट्यम स्पर्धेत आदित्य मेलगे प्रथम, चित्रकला स्पर्धेत प्रेम कंग्राळकर द्वितीय कन्नड भाषण स्पर्धेत श्रद्धा चांगळी द्वितीय, तर समूह स्पर्धेमध्ये लोकनृत्य यामध्ये राखी जाधव आणि ग्रुप प्रथम, कव्वाली मध्ये निशिगंधा व ग्रुप तृतीय या सर्व विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. ए. डी. धामनेकर, श्री. वाय. बी. कंग्राळकर, सौ. वंदना जीवई, श्री. ए. बी. कांबळे, टी. एस. बोकडेकर, एल. एस. बांडगे व एम. एम. डोंबले यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. वाय. एन. मजूकर व सचिव प्रसाद मजूकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
Belgaum Varta Belgaum Varta