बेळगाव : आनंदनगर रहिवासी संघटनेचे वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. मनोज शिवाजी पवार हे होते. श्री. पी. ए. पाटील यांनी सर्व सभासदांचे स्वागत केले. त्यानंतर उपाध्यक्ष श्री. संतोष शिवाजी पवार यांनी 2021 ते 2023 सालचा अहवाल व ऑडिट रिपोर्ट वाचून दाखवण्यात आला. सर्व सदस्यांनी 2021 ते 2023 सालच्या जमा खर्चास मंजुरी दिली. तसेच 2023 ते 2025 साठी 23 सदस्यांची नवीन कार्यकारिणीची निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून श्री. संतोष शिवाजी पवार, उपाध्यक्ष म्हणून श्री. आप्पाजी फाकिरा कुगजी तर सचिव म्हणून श्री. शंकर इराप्पा नंदी या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वांचे श्री. मनोज पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पुढील दोन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. मल्लाप्पा कुंडेकर, श्री. पी. ए. पाटील, श्री. सिताराम वेसने, श्री. किरण करंबळकर या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून श्री. मनोज पवार व त्यांच्या कार्यकारिणीने केलेल्या कामाचा गौरव केला. तसेच नवीन कार्यकरिणीला शुभेच्छा दिल्या. श्री. उदय महागावकर यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta