Monday , September 21 2026
Breaking News

प्रगतिशील लेखक संघातर्फे आचार्य अत्रे विशेष व्याख्यानमाला

Spread the love

 

बेळगाव : प्रख्यात साहित्यिक, पत्रकार, नाटक कार आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंती निमित्त प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने आचार्य अत्रे विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सुप्रसिद्ध नाटक कार व दिग्दर्शिका प्रा. संध्या देशपांडे या गुंफणार आहेत. आचार्य अत्रे यांचे मराठी नाट्यस्रुष्टीतील योगदान हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे राहाणार आहेत. शुक्रवार दि. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गिरीश कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथे हा कार्यक्रम होणार आहे. सर्वानी उपस्थित राहावे, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *