Thursday , March 5 2026
Breaking News

कृष्णा देवगाडी याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

बेळगाव : दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी कराटे इंडिया ऑर्गनायझेशन यांच्यावतीने बेंगळुरू येथे झालेल्या राज्यस्तरीय ऑफिशियल कराटे निवड चाचणीमध्ये 17 वर्षातील वयोगटात भाग घेऊन कृष्णा देवगाडी याने सुवर्णपदक पटकाविले व त्याला सुवर्ण पदक आणि प्रशस्तीपत्र देउन सन्मान करण्यात आले.
त्याकरिता कृष्णा याची राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये निवड झाली आहे.
21 सप्टेंबर 2023 रोजी देहराडून उत्तराखंड येथे होणार्‍या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये कृष्णा देवगाडी प्रतिनिधित्व करणार आहे.
त्याला कराटे प्रशिक्षक निलेश गुरखा आणि कराटे मास्टर श्री. गजेंद्र काकतीकर यांचे प्रशिक्षण लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *