अथणी : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाचा काल रात्री रस्ता अपघातात मृत्यू झाला.
अथणी तालुक्यातील नदि-इंगळगाव गावचे सैनिक असलेले लक्ष्मण घोरपडे हे सुटीच्यानिमित्त गावी आले होते. त्यातच त्यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला.
आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. शहीद जवानाच्या पार्थिवावर शुक्रवारी त्यांच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta