Thursday , March 5 2026
Breaking News

आदिशक्ती महिला सेवा संघातर्फे गोकुळाष्टमी, व्याख्यान

Spread the love

 

बेळगाव : आदिशक्ती महिला सेवा संघ टिळकवाडी बेळगाव आणि अखिल भारतीय प्रगतिशील एल्गार सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था बेळगांव व माजी विद्यार्थी संघटना बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने “छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य आणि आजची वस्तुस्थिती-परिणाम उपाय योजना एक चिंतन” या विषयावर विचारवंत स्मिता शिंदे यांचे व्याख्यान आणि गोकुळाष्टमी उसत्व, दहिहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्रीकृष्णाची भूमिका सुमेधा काळे, राधिकेची स्मिता शिंदे, बाल कृष्णाची भूमिका तनिष्क तुपारे आणि संत मीराबाईची भूमिका अरुणा पावशे यांनी साकारली.

वेगवेगळ्या एकपात्री अभिनय, नृत्य आणि विविध संवादातून श्रीकृष्णाच्या लीला सादर केल्या. यावेळी गोकुळाष्टमी सोहळ्यामध्ये नृत्य गायन वादन दांडिया गरबा दहीहंडी पाळणा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी रेश्मा सूर्यवंशी, सुजाता होसळी, उमा परदेशी, आर. एन. शिंदे, वर्षा चव्हाण, कुमुद शहापूरकर, आर. व्ही. पाटील, सारिका सुतार, अंजली गोडसे, सुनिता चिकोर्डे, धनश्री लगाडे, नैतिक शिंदे, मनस्वी खांडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिशक्ती महिला सेवा संघाच्या अध्यक्षा प्रतिभा जुवेकर होत्या. स्वागत उपाध्यक्षा सुमन दळवी यांनी केले. प्रास्ताविक विद्या पाटील यांनी केले. परिचय कांचन बनस्कर व प्रतिभा हावळ यांनी करुन दिला. सूत्रसंचालन नंदिनी पाटील यांनी तर श्वेता खांडेकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *