बेळगाव : श्री आधार मल्टी-पर्पज सौहार्द सहकारी नियमित, महाद्वार रोड बेळगाव या संस्थेत गेल्या आर्थिक वर्षात 10 लाख 55 हजाराचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष श्री. सुभाष देसाई यांनी दिली.
संस्थेची 13वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 14/09/2023 रोजी श्री. सुभाष लक्ष्मण देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीत पार पडली.
सर्व प्रथम गेल्या वर्षभरात राज्यातील व देशातील काही महनीय व्यक्तीचे तसेच संस्थेच्या काही सभासाद यांचेही निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
श्री. सुभाष लक्ष्मण देसाई यांनी स. न. 2022-23 च्या अहवालाचे वाचन केले. संस्थेचे एकूण सभासद 624 असून भागभांडवल रु.19,66,800/-, राखीव व इतर निधी रु.1,21,71,261/- आहेत तसेच संस्थेमध्ये रु.3 कोटी 93 लाखाच्या ठेवी असून संस्थेने
विविध स्वरुपात सभासदांना कर्जे दिली आहेत कर्ज येणे रु.3,27,17,975/-. विविध बँकांमध्ये रुपये 2 कोटी 14 लाखाची गुंतवणूक केलेली आहे असे त्यांनी सांगितले. स. न. 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये रु.10,55,115.53 नफा झाला असून सभासदांना 12% लाभांश मंजूर करण्यात आला आहे.
संस्थेचे व्यवस्थापक श्री. कल्लाप्पा संकन्नावर यांनी मागील वर्षाच्या ठरावाचे वाचन, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, नफ्याची विभागणी व अंदाज पत्रकाचे वाचन केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक संचालक श्री. अनंत लाड, श्री. प्रदीप अष्टेकर व संचालक श्री. सुनील चौगुले, यांनी चर्चेत भाग घेतला. तसेच, संचालक श्री. अनंत पाटील, श्री. भोमाणी बिर्जे, श्री. रामा बाचूळकर, श्री. विकास मजूकर , श्री. महादेव ठोकणेकर, श्री. बाळकृष्ण दंडगलकर, श्री. अशोक अमरगोळ, श्रीमती. कल्पना मोहिते व सौ. पूजा गुरव या संचालकांसह सोसायटीचे कर्मचारी पिग्मी कलेक्टर्स व इतर सभासद उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संथापक संचालक श्री. प्रदीप अष्टेकर आणि श्री. अनंत लाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब चोपडे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta