हैदराबाद : तिरुपतीला जाण्यासाठी निघालेल्या बेळगाव येथील पाच जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची अधिक माहिती समोर आली आहे. मृत सर्वजण अथणी येथील असून यातील चार जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे.
तिरुपती थिम्पप्पाला भेटण्यासाठी चित्तूरला जात होते. दरम्यान, एका ट्रकची क्रूझरला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले. जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
आंध्र प्रदेशातील केव्हीपल्ली तालुक्यातील मठपल्ली गावात ही दुर्घटना घडली. हनुमंत अजुर(52), मानंदा अजुर (46), शोभा अजुर (36), अबीका अजुर (19) आणि मनमंता जाधव (52) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण अथणी तालुक्यातील बडाची गावातील आहेत.
जखमींना रुवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta