
पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : विश्वकर्मा यांना सृष्टीचा पहिला निर्माता मानला गेला जातो. जगाच्या निर्मिती करणारा विश्वकर्मा यांना आद्य पुजले जाते. विश्वकर्मा जयंती दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरी केली जाते. भगवान विश्वकर्मा हे विश्वाचे निर्माता आणि पहिले शिल्पकार म्हणून ओळखले जातात. विश्वकर्मा समाजाचे अतिशय मोठे योगदान आहे. समाज निर्मितीमध्ये विश्वकर्मा समाजाचे अतिशय मोठे योगदान आहे. या दिवशी रवि नावाचा शुभ संयोगही घडत असल्याने या दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. भगवान कृष्णाच्या द्वारकेपासून शिवाजीच्या त्रिशूल आणि हस्तिनापूरपर्यंत सर्व काही त्यांनीच बांधले.
कर्नाटक सरकार , जिल्हा पंचायत बेळगाव, सांस्कृतिक विभाग, आणि विश्वकर्मा समाज संस्थेच्या वतीने तसेच महानगरपालिका बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वकर्मा जयंती उत्सव आणि विशेष व्याख्यानाचे आयोजन कुमार गंधर्व सांस्कृतिक भवन एसपी ऑफिस जवळील सांस्कृतिक भवन येथे रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता विशेष व्याख्यान आणि विश्वकर्मा जयंती सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ होते. यावेळी प्रमुख उपस्थित व्यासपीठावर बेळगाव जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. सतीश जारकीहोळी, महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, प्रमुख वक्ते म्हणून घटप्रभा येथील निवृत्त शिक्षक गुंडुपंत पत्तार, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, बसवराज सुतार, मुरली बडगेर, रोहिणी गंगाधरया, सांस्कृतिक विभागाच्या अधिकारी विद्यावती बजंत्री, ज्योती सुतार, विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष राघवेंद्र हावनुर, केपीसीसी अध्यक्ष मल्लगौडा पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि फोटो पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रारंभी पर्यावरण संवर्धनासाठी रोपट्याला पाणी घालून संदेश देण्यात आला.
विश्वकर्मा समाजाच्या वतीने नूतन मंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर, उत्तरचे आमदार राजू सेठ यांचा विश्वकर्मा समाजाच्या वतीने भव्य दिव्य विशेष असा अनोखा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर म्हणून या मान्यवरांनी विशेष आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थितीत संतोष पत्तार, मारुती लोहार, सुधीर लोहार, गजानन साबणावर, भारती बडगेर, बसवराज बडगेर, प्रा. निलेश शिंदे, मुरली बडगेर, नारायण पाटील, भगवंत पत्तार, के. एच. बडगेर, पोर्णिमा पत्तार, अशोक पत्तार, राजू सुतार, सागर गुंजीकर, रेखा सुतार, अनिल पाटील, कृष्णा सुतार, अरुणा कोळी, वनिता सायनेकर यासह बेळगाव जिल्ह्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाधिकारी सदस्य कर्मचारी विद्यार्थी पालक शिक्षक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत आणि प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग अधिकारी विद्यावती बजंत्री यांनी केले. सूत्रसंचालन सुनिता देसाई यांनी केले तर भारती बडगेर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta