कित्तूर : कित्तूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या तिगडोळी गावात रात्री एका गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली.
विजय रामचंद्र अरेर (३२ वर्षे) या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाची हत्या करण्यात आली. क्षुल्लक कारणावरून त्याचे व कल्लाप्पा सदेप्पा क्यातनावर (४८ वर्षे) यांच्यात भांडण झाले आणि मद्यधुंद अवस्थेत विजय अरेर याने मारामारी करून कल्लाप्पा याच्यावर तलवारीने वार केले. त्यानंतर कल्लाप्पा क्यातनावर आणि भरत हित्तलकेरी यांनी एकत्र येऊन विजयवर कोयत्याने वार केले. विजयच्या दोन हातावर गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.
कल्लाप्पा क्यातनावर याच्या कानाला आणि पाठीला दुखापत झाल्याने त्यांना धारवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta