
बेळगाव : गणेश चतुर्थी उत्सवात बेळगावच्या राजाचे शनिवारी सकाळी आठ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक चवाट गल्ली बेळगाव येथील 1500 विद्यार्थ्यांनी महाआरती करून बेळगावच्या राजाला महावंदना दिली.
यावेळी कपलेश्वर महाआरती मंडळाने मोठ्या जयघोषात तब्बल अर्धा तास आरती म्हणून गणरायाचा जयघोष केला.
यावेळी महाआरतीला प्रमुख उपस्थिती बेळगाव तालुका रुरल सोसायटीचे चेअरमन मारुतीराव मादार, शिवाजी शहापूरकर, रमेश मोदगेकर यासह अन्य संचालक उपस्थित होते. तसेच साई प्यालवूडचे संचालक परशराम कदम, नगरसेवक शंकर पाटील, मराठा बँकेचे चेअरमन दिंगबर पवार, सेंट्रल हायस्कूलचे प्राध्यापक विश्वजीत हसबे, एन. डी. पाटील, एल. एन. शिंदे, इतर सर्व शिक्षक उपस्थित होते.
गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाआरतीचा कार्यक्रम आयोजित गणेशोत्सव मंडळाने केला होता. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूचे वाटप करून त्यांचे स्वागत केलं व सोबतही लहान मुलं या गणरायाच्या आरतीला आल्या असल्याकारणाने महाप्रसादाच्या निमित्ताने त्यांना गोड खाऊ देण्यात आलं.
यावेळी प्रमुख पाहुणे व शिक्षकांचा सन्मान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. नगरसेवक शंकर पाटील यांनी सत्काराला बोलतांना म्हणाले, ज्या शिस्तबद्ध पद्धतीने बेळगावच्या राजाच्या गणपतीसमोर महाआरती केली गेली आणि म्हणूनच याला बेळगावचा राजा म्हणून संबोधलं जातं अशा बेळगावच्या राजाची महाआरती मोठ्या उत्साहाने चवाट गल्लीत संपन्न झाली.
यावेळी उपस्थित गल्लीतील पंच प्रताप मोहिते, उत्तम नाकाडी, किसन रेडेकर, विनायक पवार, श्रीनाथ पवार, सुनील जाधव, सत्यम नाईक, रोहन जाधव, जोतिबा पवार, जोतिबा किल्लेकर वृषभ मोहिते, उमेश मोहिते, प्रशांत कुडे, विशाल गुंडकल, सुधीर धामणेकर, प्रभाकर किल्लेकर, निलेश गुंडकल, विश्वनाथ मुचंडी, अंनत बामणे, संदिप कामुले, जोतिबा (सोन्या) किल्लेकर, उमेश मेणसे, निलु गुंडकल, निखिल पाटील, सुनिल गुंडकल, गजानन पवार, निखिल पाटील, महेंद्र पवार, आकाश कुकडोलकर, लक्ष्मण किल्लेकर, मोहन किल्लेकर, चंद्रकांत कणबरकर यासह गल्लीतील महिला वडीलधारी, युवा उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta