बेळगाव : बेळगावचा एकदंत सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने “कुंभकर्ण सारखा निद्रा अवस्थेत असलेले आपला हिंदु बांधव” ह्या देखाव्याचे उद्घाटन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व समिती नेते श्री. रमाकांतदादा कोंडूसकर व डॉक्टर रवि पाटील यांच्या हस्ते फीत कापुन करण्यात आले. तसेच ‘बेळगावचा एकदंत’ टी शर्टचे अनावरण लोकमान्य महामंडळचे अध्यक्ष श्री. विजयदादा जाधव व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते श्री. हिरामनीदादा मुचंडीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंद्रजित पाटील, अजित जाधव, उमेश कुलकर्णी, प्रकाश पाटील, महेश बडमंजी, प्रताप चौधरी, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष नागेश गावडे आभार मानले तर सूत्रसंचालन अरुण गावडे यांनी केले. यावेळी गल्लीतील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta