Thursday , March 5 2026
Breaking News

आंबेवाडीतील मुलांच्या खो-खो संघाचा जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीणमधील आंबेवाडी गावातील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेतील मुलांच्या खो-खो संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. रामदुर्ग येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी आंबेवाडी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष चेतन पाटील व सागर सुतार यांनी खो-खो संघाला प्रोत्साहनात्मक म्हणून टी-शर्ट, पॅन्ट व जर्सी दिले तर बेळगाव ग्रामीण भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी यळगुकर, सदस्य नारायण लोहार, सदस्या सुवर्णा लोहार, माजी ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा सांबरेकर, मल्लाप्पा बेळगावकर, समाजसेवक विक्रम यळगुकर, राहुल भातकांडे, शुभम तरळे, बसवंत कातकर, बाळू पाटील, संतोष कोवाडकर, अरविंद मनोळकर, विजय जंगम, विलास मनोळकर, राजू सांबरेकर, विक्रम तरळे, उमेश शहापुरकर, सिद्राय तरळे, शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, सदस्या, मुख्याध्यापक व सहशिक्षक, शिक्षिका विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *