
बेळगाव : सरकारी शाळा वाचवण्यासाठी मोहीम आखण्यात आली असून बऱ्याच शाळांना अतिथी शिक्षक अजून मिळालेले नाहीत त्यानंतर काही शाळांमध्ये एक शिक्षकांच्यावर दोन वर्ग शिकवण्याचे जबाबदारी पडलेली आहे. आपल्या शाळेला शिक्षक मिळावेत म्हणून शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयाला हेलपाटे मारून देखील शाळेला शिक्षकच मिळत नाहीत शिक्षकांची अडचण घेऊन गेल्यास थातूरमातूर उत्तर देऊन पाठवलं जातं शिक्षकांची संख्या कमी होत असताना सुध्दा शिक्षक भरती रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्या कारणाने बऱ्याच पालकांनी आपल्या पाल्याला खाजगी शाळेत प्रवेश मिळवण्याचा कल वाढलेला आहे. त्यामुळे सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळेत शिक्षणाच्या नावावर भरमसाठ आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. म्हणूनच सरकारी शाळा वाचवण्याची मोहीम या माध्यमातून उद्या बुधवार दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २-०० वाजता मराठा मंदिर येथे सर्व सरकारी शाळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण प्रेमी अशा सर्वांची बैठक बोलवण्यात आले असून यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संतीबस्तवाड येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेचे अध्यक्ष गंगाधर गुरव तसेच चलवेनहट्टी प्राथमिक मराठी शाळेचे अध्यक्ष मनोहर हुंदरे यांनी आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क गंगाधर गुरव 9008382348, मनोहर हुंदरे 9945346640
Belgaum Varta Belgaum Varta